Politics

मुंबई कि तुंबई : कारणे व स्पष्टीकरण

मुंबई महानगरपालिका मागील कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. व तोंडावर आलेल्या महानगरपालीच्या निवडूणुक लांबणीचे सत्र जोर धरत आहे

मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजधानी व सर्वाधिक लोकसंख्येचं शहर. कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वारली ह्या सात बेटांनी वेढलेलं हे शहर. मुंबई म्हटलं कि स्वप्नांची नगरी, भला मोठा समुद्रकिनारा लाभलेलं वैविध्यपूर्ण वैभवशाली इतिहास ज्याची पाठराखण करतो असं शहर. मुंबईतील पावसाळा म्हटलं कि एक अविस्मरणीय दृश्य त्याचसोबतच बऱ्याच लोकांचा चिंतेचा विषय म्हणजे मुंबईतील पाऊस.

मुंबई ओळखली जाते त्याचा बेमोसमी वादळी वाऱ्यासाठी आणि पावसासाठी. मुंबईच हे विशेष पावसाळी चिंताग्रस्थ वातावरण व त्या मागचे ठळक कारणे म्हणजे २६ जुलै २०१५ रोजी आलेला पूर व त्यात मृत्युमुखी पडलेले हजारो लोक. मुंबई साक्ष आहे त्या हजारो मृतकाच्या बळी पडण्याला. ह्या पुराणे अनेकांना बेघर केलं, कित्येक लोकांचे परिवार उध्वस्त झाले. २००५ साली स्थापन करण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीने मुंबई महानगरपालिकेला अनेक तथ्य प्रस्तुत केले व त्यानुसार बदल करण्यात आले. 23 ते 25 मे 2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या  G20 देशांचे आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्यगटाची दुसरी बैठक पार पडली व त्यात बैठकीचे पाच मुख्य चर्चेचे मुद्दे समोर आले जसे कि तात्काळ चेतावणी, लवचिक पायाभूत सुविधा, स्थानिक आणि जागतिक प्रतिसाद, आणि  नैसर्गिक उपाय ह्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षीप्रमाणेच पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कालवे १००% स्वच्छ केले जातात. तरीही दरवर्षी मुंबईच्या सखोल भागात पाणी साचते. यामागील काही विविध कारणे व ठळक बाबी जाणून घेऊया .

मुंबईची भौगोलिक पार्श्वभूमी

मुंबई हे शहर सात बेटांचे एकत्रीकरण करून बनवण्यात आलेले आहे. मुंबईचा अधिकतर भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनी भूभागाची उंची सरासरी १० ते १५ मी इतकी आहे. पूर्वी ह्या शहराला विकसित करण्यासाठी अनेक पायंडे आखण्यात आले त्यातिलक म्हणजे दलदलीच्या ठिकाणी भराव टाकण्यात आला हा भरावाचा भाग सखल भागात असल्यामुळं तेथे दरवर्षी पाणी साचते. २००५ साली आलेल्या अभूतपूर्ण पुरात मिठी नदीचा असलेला मोठा वाटा व त्यामुळे निर्माण झालेली जीवितहानी ह्या साठी कारणीभूत आहेत. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी व खोलीकरणासाठी १४ वर्षात २००० कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१९ साली मिठी नदीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणाची तळी बुजवून तेथील जागा हि समतल करण्यात अली आहे. भौगोलिक परिस्थिती बघता नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतो आणि पुरग्रस्थ परिस्थिती निर्माण होते.

लोकसंख्या, पावसाचे वाढते प्रमाण व भरती

वाढती लोकसंख्या त्यामुळे होणारे बदल यांचा मुंबईच्या जीवनमानावर बराच परिणाम होतो. वाढत्या उंचचउंच इमारती व झोपडपट्या यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर होणारा खूप मोठा बदल व त्यामुळं निर्माण झालेल्या अनेक समस्या जसे कि खारफुटी जंगला मुळे समुद्राच्या पाण्यापासून मुंबईचे रक्षण होते पण वाढत्या लोकसंख्ये मुळे मुंबईच्या खारफुटी जंगलांचा ह्रास होत चालला आहे. मिठागराचा होणार नाश पुरासाठी कारणीभूत आहे. पावसाच्या पाण्याचे वाढते प्रमाण व सतत येणारी भरती ओहोटी यांमुळे समुद्रसपाटीवर होणार बदल यांचा अतिशय प्रभाव पडतो. मुंबई मध्ये एक सखोल पातळी उंची पावसाने मिळवल्यावर मुंबई चे रूपांतर तुंबईत होते. मुंबईत वाढणाऱ्या पावसाचे प्रमाण व त्याचा समुद्रात होणार निचरा ह्या अभावाने अशी परिस्थिती निर्माण होते.

यंत्रणांचा अभाव व  नियोजनाची होणारी धिंडोली

सांडपाण्याच्या निचऱ्यामुळं निर्माण होणाऱ्या पाण्याची विल्हेवाट व त्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्या, भराव टाकून समतल करण्यात आलेली भूभागाची पातळी व मनुष्य निर्मित इमारतींचे जाळे यांमुळे प्रशाशकीय यंत्रांवर मोठा दबाव निर्माण होतो. रस्ते बांधणी करताना न केले गेलेला विचार व मागील बऱ्याच वर्षांपासून गांभीर्यानं न घेतल्या गेलेल्या योजना यांस कारणीभूत आहे. मुंबई मध्ये असणाऱ्या अनेक प्रशाकीय यंत्रणा जसे कि  MMRDA, MSRDC, MHADA, MMRC, महावितरण, रिलायन्स एनर्जी, रेल्वे, मुंबई महापालिका, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, लष्कर, विमानतळ प्राधिकरण या यासामन्धी काम करतात पण त्यात समन्वय दिसून येत नाही. एकसुत्रीकरणात या यंत्रणा नसल्यामुळं त्यांना एका सूत्रात आणणे खूप महत्वाचे होऊन बसले आहे

बेजबाबदार सरकार, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ह्रास व मुंबईकरांचे हाल

मुंबई महानगरपालिका मागील कित्येक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. व तोंडावर आलेल्या महानगरपालीच्या निवडूणुक लांबणीचे सत्र जोर धरत आहे. गेल्या एक वर्षांपासून महानगरपालीच्या निवडणूक झालेली नाही. महानगरपालिका पूर येण्या आधी योग्य ती जबाबदारीने काम करण्यासाठी सज्ज होते पण कामात नसलेली पारदर्शकता शिवाय योग्य तो यंत्रणांच्या अभावामुळे समस्या निर्माण होतात. पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी बीएमसीने भूमिगत पाणी साठवण टाक्या आणि पंपिंग स्टेशन बांधले आहेत पण त्यांची क्षमता इतकी नाही कि पूरग्रस्त वातावरणात तग धरू शकतील . या सर्व धुविधेत अडकलेला मुंबईच्या नागरिकाचे जीवनमान या पूरग्रस्त परिस्थितीत विस्कळीत होते.

पूरग्रस्त परिस्तिथी उदभवू नये म्हणून घ्यावयाची दक्षता

१) आधीच अस्तित्वात असलेले जलमार्ग आणि वाहिन्यांचे विस्तार आणि खोलीकरण.

२) रस्त्यावर पाणी साचलेले असताना सक्रिय वाहतूक व्यवस्थापन.

३) पूर चेतावणी आणि अंदाजांसाठी "nowcasting" वर श्रेणीसुधारित करण्यात हवे व नेटवर्कमध्ये डॉपलर हवामान रडार स्थापित केले पाहिजे.

४) इशाऱ्यांबद्दल जनजागृती लोकांना कसे करावे हे शिकवावी.

५) पूरग्रस्त परिस्तिथी कमी करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टम निर्माण करावी.

New Dalai Lama Selection: China's Intervention Sparks Conflict

BRICS For UNSC Reform: Targets US Tariffs, Middle East Tensions

बिहार के निष्क्रिय दलों को चुनाव आयोग की चेतावनी

Spiritual Socialism: Pawan Kalyan’s Evolution Towards Sanatana

Political Revenge: Elon Musk's Bold Venture – ‘The America Party’